CSC Olympiad


ऑलिम्पियाड 
(Olympiad) कोर्स?
संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या एका नवीन शैक्षणिक स्पर्धा परीक्षा अर्थात केंद्र शासनाच्या NCRT मान्यता प्राप्त ऑलिम्पियाड Olympiad ) कोर्स आता सीएससी अकॅडेमी केंद्रामार्फत CSC पोर्टलवर उपलब्ध त्याबद्दल अधिक माहिती घेऊ.

१) ऑलिम्पियाड ( Olympiad ) कोर्स?

                Olympiad हि एक स्पर्धा परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येते. हि स्पर्धा परीक्षा पूर्णपणे शालेय शिक्षणावर आधारित असते. विविध स्वतंत्र संस्था याचे आयोजन करतात पण आजची ग्रामीण भागातील परिस्थिती बघता आयटी मंत्रालया मार्फत CSC (Common Service Center) द्वारा नाममात्र शुल्क भरून हा CSC पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे व त्याचा फायदा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना आपल्या मोबाइल किव्हा कम्प्युटर द्वारे करून घेता येईल.

काय आहे ऑलिम्पियाड:

ऑलिम्पियाड परीक्षा ही स्पर्धा परीक्षा शाळा तसेच शैक्षणिक संस्था स्तरावर घेण्यात येते. हे पूर्णपणे शालेय अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि विविध स्वतंत्र संस्था आयोजित करतात. या स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना भविष्यातिल शिक्षणात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे आहे.

शहरी विद्यार्थ्यां प्रमाणेच छोटे शहर व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करणेविद्यार्थ्यां मध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे आणि त्यांना उत्तेजन देणे. जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना भविष्यासाठी चांगले तयार करण्यात मदत करणे. शैक्षणिक स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणेविद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित करणे.

भविष्यातील टॅलेंट पूल:

ऑलिम्पियाड परीक्षा युवा अलौकिक गुण ओळखण्यास मदत करतात. हिंदीगणितइंग्रजी आणि विज्ञान अशा विविध विषयांवर विविध परीक्षा घेतल्या जातात ज्या विद्यार्थ्यांना वेळेत जटिल समस्या सोडविण्यास मदत करतात. ती फक्त परीक्षाच नाहीविद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भविष्यासाठी एक टॅलेंट पूल तयार करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

एक मोठा व्यासपीठ प्रदान करते:

CSC Olympiad सारख्या विविध इतर फाऊंडेशनद्वारे आयोजित ऑलिम्पियाड एक मोठे व्यासपीठ प्रदान करते जिथे प्राथमिक स्तराचे विद्यार्थी देखील राज्यराष्ट्रीय स्तरावर आपली कौशल्य दर्शवू शकतात.

वर्ग निकालांमध्ये सुधारणाः

ऑलिम्पियाड परीक्षा विद्यार्थ्यांच्या नित्यनेस वर्गाचा निकाल सुधारण्यास मदत करते. ऑलिम्पियाड्स त्यांचे वैचारिक आकलन सुधारतात आणि विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना समजण्यास सक्षम करतात.

अतिरिक्त ज्ञान मिळवा:

ऑलिम्पियाड परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्याची संधी देते. ते अशा स्तरावर अनेक समस्या सोडवतात ज्या त्यांच्या वर्गात संभवत नसतात. विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळते आणि स्पर्धा आणि शिकण्याचे लवकर प्रदर्शन मिळते. ते आत्मविश्वासाने उत्तरे लिहायला शिकतात.

तर्कशक्तीची क्षमता सुधारते:

या परीक्षा विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचार जोपासण्यास मदत करतात जी कोणत्याही परीक्षेत उपयोगी ठरते. ऑलिम्पियाड्स केवळ तार्किक विचार सुधारत नाहीत तर मंथन करण्यास मदत करतातविश्लेषणात्मक आणि त्क क्षमतासमस्या सोडवण्याची कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढवतात. एकंदरीतहे विद्यार्थी अवस्थेत मुलाच्या विकासास मदत करते.

२) विद्यार्थ्यांसाठी Olympiad  परीक्षेचे थोडक्यात फायदे

★ विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.

★ विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.

★ विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.

★ विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.

★ विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षे साठी तयार करण्यात येते.

★ पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.

★ शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.

       सर्व पालकांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांची तसेच इतरांची नोंदणी केली पाहिजे कारण आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय फलदायी आहे. जागरूक पालक या नात्याने त्यांना त्यांच्या आवडीनुसार उपक्रम निवडण्यास मदत करून त्यांना भविष्यातील आयुष्यात उत्कृष्ट बनविण्यात मदत करू. मोठ्या शैक्षणिक संस्थामध्ये व उच्च शिक्षणासाठी अॅडमिशन घेते वेळी ऑलिम्पियाड्स प्रमाणित (extra-curricular activities) अभ्यासेतर उपक्रम असणाऱ्या मुलांकडे प्राधान्याने पाहिले जाते. म्हणूनच आपल्याला 3 री ते 12 वी पर्यंत मुलांना ऑलिम्पियाडमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे यामुळे आपल्या मुलास स्पर्धात्मक मोडमध्ये येण्यास आणि पुढे येणाऱ्या आव्हानासाठी तयार राहण्यास मदत होते.

३) ऑलिम्पियाड (Olympiad)  परीक्षेचे विषय

Registration through CSCs is open for All Olympiads

इयत्ता ३ री ते १० वी साठीचे विषय:-

१) विषय :- Science (विज्ञान) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National Science Olympiad - CANSO

२) विषय :- Mathematics (गणित):-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National Mathematics Olympiads - CANMO

३) विषय :- English (इंग्रजी) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National English Olympiad - CANEO

४) विषय :- Hindi (हिन्दी) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National Hindi Olympiad – CANHO

इयत्ता ११ वी व १२ वी साठीचे विषय:-

१) विषय :- Mathematics (गणित):-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National Mathematics Olympiads - CANMO

२) विषय :- English (इंग्रजी) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National English Olympiad - CANEO

३) विषय :- Hindi (हिन्दी) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy - National Hindi Olympiad – CANHO

४) विषय :- Physics (भौतिक विज्ञान) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy – National Physics Olympiad – CANPO

५) विषय :- Chemistry (रसायन विज्ञान) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy – National Chemistry Olympiad – CANCO

६) विषय :- Biology (जीव विज्ञान) :-
परीक्षेचे नाव व कोड :- CSC Academy – National Biology Olympiad – CANBO
 

४) ऑलिम्पियाड (Olympiad) कोर्स व परीक्षेची भाषा 
ऑलिम्पियाड हिन्दी आणि इंग्लिश दोन भाषांमध्ये उपलब्ध असतील.


५) ऑलिम्पियाड (Olympiad) परीक्षेचा शुल्क (फी) व अंतिम दिनांक:- 
नोंदणी शुल्क:- प्रति ऑलिंपियाड 125/- रुपये फक्त
एका किव्हा त्यापेक्षा जास्त परीक्षेस बसण्यासाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागतील.
नोंदणीची अंतिम दिनांक :- 1 ऑगस्ट 2020

६) ऑलिम्पियाड (Olympiad) परीक्षेस सामील होण्यासाठीची पद्धत
# विध्यार्थ्यांना वरील पैकी कुठल्याही एका किव्हा त्यापेक्षा जास्त परीक्षेस बसण्यासाठी त्यास ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असेल.

रजिस्ट्रेशन झाल्यावर आपणास एक यूजर आयडी व पासवर्ड २४ तासाच्या आत मध्ये त्यांच्या मोबाईल देण्यात येईल.

या कोर्समध्ये विध्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन झाल्यावर http://cscolympiad.com/ या वेबसाईट वर जाऊन लॉगिन करून अभ्यासअसाइनमेंट व ५ मॉक टेस्ट ज्या मंडळाच्या नवीन पद्धतीने व अभ्यासक्रमा प्रमाणे सरावासाठी देण्यात येईल आणि अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद व अनुभव सुद्धाघेता येईल.

कोर्स मधील मॉक टेस्ट विध्यार्थी घरबसल्या आपल्या कम्प्युटर किव्हा मोबाइल मार्फत देऊ शकतो व संपूर्ण मॉक टेस्ट झाल्यावर तो अंतिम परीक्षेसाठी तयार होतो.

विध्यार्थ्यांना ऑलिम्पियाडची अंतिम ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी आपल्या प्रत्येक तालुक्यात एक सीएससी अकॅडेमी उपलब्ध आहेत तेथे जाऊन परीक्षा द्यावयाची आहेत.

अंतिम ऑनलाईन ऑलिम्पियाडची परीक्षा तारीख ऑगस्ट 2020 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल व त्या सबंधित सीएससी कडून माहिती पाठविण्यात येईल. (लॉकडाऊनवर अवलंबून बदल होऊ शकतो)

दिंडोरी तालुक्यातील विध्यार्थ्यांसाठी बालाजी इन्फोटेक हे एकमेव सीएससी अकॅडेमी केंद्र आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना सीएससी कडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
 
७) ऑलिम्पियाड (Olympiad)  परीक्षेत विध्यार्थ्यांस सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल 

CSC Olympiad Sample Certificate
 

-: प्रवेश करण्यासाठी पुढील Enrolled Now या बटणावर क्लिक करा:- 

 -: अधिक माहितीसाठी संपर्क :-

सीएससी अकॅडेमी केंद्र

बालाजी इन्फोटेक, दिंडोरी

नारायणी संकुलदिंडोरी-उमराळे रोड,

टेलिफोन कॉलनी, दिंडोरी

ता.दिंडोरी जि.नाशिक

मोब. 7620612019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा